Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

HIV ग्रस्त लहान मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी - कार्यशाळा

July 31, 2011

Search by Tags:  Cultural Organizations

मुक्ता चॅरीटेबल फौंडेशन ही एक समाजऋणाचे भान असणाऱ्या समविचारी नागरिकांनी एकत्र येऊन सुरु केलेली नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आहे. " संवाद HIV /AIDS हेल्पलाईन'' हा मुक्ताचा उपक्रम आहे.

संवाद हेल्पलाईन चे प्रशिक्षित समुपदेशक, HIV / AIDS गुप्तरोगांविषयी अद्ययावत शास्त्रीय माहिती देणे,शंका समाधान करणे,संदर्भ सेवा पुरविणे निष्पक्षतेसह समवेदनेने समुपदेशन करणे ही कामे करतात. फोन करणाऱ्याला नांव पत्ता सांगावा लागत नाही. २००५ ला सुरु झालेल्या या विनामूल्य सेवे द्वारा आत्ता पर्यंत ८० हजारां हून जास्त व्यक्तींनी लाभ घेतला आहे. मुक्ताचे स्वयंसेवक स्वत:चे उद्योग व्यवसाय सांभाळून बरीचशी कामे करतात. सामाजिक बांधलकी मानणाऱ्या व्यक्ती संस्थां कडून मिळणाऱ्या देणग्यांमधून मुक्ता चा खर्च चालविला जातो.

आज भारतात जवळ जवळ २लाख, १४ वर्षा खालील मुले HIV बाधित आहेत.दररोज ६०००० हून जास्त नवजात बालके HIV सह जन्माला येतात. आणि याही पेक्षा जास्त मुले HIV च्या परिणामांना सामोरी जात आहेत या मुलांना त्यांच्या स्थिती विषयी कसे, केव्हा, किती सांगायचे? मुक्ता ने नुकतेच २५ ते २७ जुलै ला एक सर्टीफीकेट कार्यशाळा आयोजित केली होती. " Issues Related to Psychological Health of Children infected /affected by HIV ". या नावे. कार्यशाळा घेण्यासाठी लंडन मधील हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या clinical psychologist -DR.Rachel Harman आणि Debbie Levitt आल्या होत्या. पुणे पुण्या बाहेरील HIV ग्रस्त बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थां मधील एकूण २२ जणांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

Search by Tags:  Cultural Organizations
Top

Suneeta Gadre's Blog

Blog Stats
  • 14889 hits